पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मर्मबंधातली ठेव ही - प्रस्तावना

रसिकहो नमस्कार    जगातली प्रत्येक व्यक्तीपाशी ‘मर्मबंधातली ठेव’ असतेच ! मानसशास्त्रीयदृष्ट्या असावीच लागते. ह्या ठेवीमध्ये व्यक्तीला आलेले सुखद-दुःखद अनुभव, कडू-गोड आठवणी, आवडी-निवडी अश्या अनेक गोष्टी असतात. अशी ठेव फक्त व्यक्तीपाशी असते असे नाही तर ती एका समाजाची वा संपूर्ण राष्ट्राचीही असते  !!     नाटक आणि नाट्यसंगीत ह्या दोन्ही गोष्टी मराठी माणसाची आणि समाजाची ‘मर्मबंधातली ठेव’ आहेत !! मराठी संगीत नाटक आणि नाट्यसंगीत मराठी माणसाचे मर्मबंधातली ठेव कसे झाले, वाढले, बदलले मागे पडले, पुन्हा पुढे आले त्या विषयक माहिती निरनिराळ्या माध्यमातून (ऑडियो - विडीयो लिंक्स, दुर्मिळ फोटो, पुस्तकातील उतारे इत्यादी)  ह्या ब्लॉग वर ठेवण्यात येणार आहे.  मराठी संगीत नाटकांचा आणि नाट्यसंगीताचा १८४३ ते १९७३ ह्या १३० वर्षाच्या कालखंडाचा इतिहास  ह्या ब्लॉग  द्वारे मांडण्यात येणार आहे. आपणा सर्वाना हा प्रयत्न जरूर आवडेल आणि आपण हा  ब्लॉग  आवर्जून वाचाल  आणि त्यावर ठेवण्यात आलेले ऑडियो - विडीयो साहित्य  ऐकाल, त्यावर आपला प्रतिसाद कळवाल अशी मला खात्री आहे.